
सासवड – ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण सु्प्रसिद्ध चित्रपट अभिनेता रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड यांना पाठविण्यात आलं. मूळचे पुरंदर तालुक्यातील मावडी क. प. या गावचे असलेले रजनीकांत यांना माजी सरपंच हनुमंत चाचर, स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार यांची स्वाक्षरी असलेलं निमंत्रण पाठविण्यात आलंय, अशी माहिती संमेलनाचे राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष दशरथ यादव यांनी दिली.
