ओबामा स्वत: मोदींना देतील- सिन्हा

रांची – ‘नरेंद्र मोदी स्वत:हून अमेरिकेकडे व्हिसाची मागणार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एक दिवस स्वत: भारतात येऊन मोदींना अमेरिकेचा व्हिसा द्यावा लागेल,’ असा विश्वास माजी परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केला. रांची येथे झालेल्या भाजपच्या सभेत ते बोलत होते.

सिन्हा यांनी यावेळी यूपीए सरकारच्या परराष्ट्र धोरणांवर जोरदार टीका केली. ‘कधी पाकिस्तानी सैनिक भारतीय जवानांची मुंडकी छाटतात, कधी चीन भारतीय हद्दीत घुसखोरी करतो तर कधी अमेरिका भारतीय दूतावासातील महिला अधिकाऱ्याची कपडे काढून चौकशी करते. यूपीए सरकारच्या कचखाऊ भूमिकेमुळेच या देशांची ही हिंमत होते,’ असा संताप सिन्हा यांनी व्यक्त केला.

मोदींच्या व्हिसाच्या मुद्द्यावरून सिन्हा यांनी अमेरिकेवर तोफ डागली. ‘मोदींना अमेरिकेच्या व्हिसाची गरज नाही. तशी मागणीही कुणी करणार नाही. एक दिवस असा येईल जेव्हा ओबामा स्वत: भारतात येऊन सन्मानाने मोदींना व्हिसा देतील. तसे न झाल्यास आमचे सरकार ओबामांचा व्हिसा रद्द करील,’ असेही त्यांनी ठणकावले.

Leave a Comment