पाच दिवसात धूम:3 ची कमाई 169 कोटींवर

मुंबई : आमीर खान, अभिषेक बच्चन आणि कतरीनाचा ‘धूम थ्री’ कमाईच्या बाबतीत देखील धूम करतो आहे. अवघ्या पाचच दिवसात ‘धूम थ्री’ 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. केवळ पाचच दिवसात 150 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारी ‘धूम थ्री’ ही पहिली फिल्म ठरली आहे. त्यामुळं या फिल्मसमोर कमाईचे सर्वच रेकॉर्ड छोटे पडतांना दिसत आहेत.

‘धूम थ्री’ हा चित्रपट एकाच वेळी हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषेत रिलीज झाला आहे. मंगळवारी या तिन्ही भाषांमधल्या कमाईचा हिशोब केला तर ‘धूम थ्री’ आजवर सर्वात वेगानं 150 कोटीच्या घरात प्रवेश केला आहे. मंगळवारपर्यंत हिंदीत रिलीज झालेल्या ‘धूम थ्री’नं तब्बल 141 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तामिळ आणि तेलगू भाषेत हीच कमाई 9 कोटींपर्यंत पोहचली आहे.

त्यामुळं तिन्ही भाषांचा हिशोब केला तर ‘धूम थ्री’ च्या कमाईचा आकडा 150 कोटी रुपयांवर पोहचला आहे. त्यानंतर मंगळवारच्या दिवशी ‘धूम थ्री’नं 19 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळं मंगळवार अखेर एकुण कमाई 169 कोटी रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळं बॉक्स ऑफिसवर ‘धूम थ्री’ चांगलीच धूम करत असल्याचं चित्र आहे. बॉलिवूड फिल्मच्या कमाईच्या बाबतीत 240 कोटींची कमाई करत हृतिक रोशनची ‘क्रिश-3’ ही फिल्म पहिल्या क्रमांकावर आहे. तर तब्बल 226 कोटींचा गल्ला गोळा करत किंग खानची ‘चेन्नई एक्सप्रेस’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण ‘धूम थ्री’

Leave a Comment