राहुल गांधींचा उमाळा : अखिलेश यांची टीका

नंदगाव – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातल्या मुझफ्ङ्गरनगर दंगलीतील पीडितांच्या शिबिरांना अचानक भेट देऊन त्यांची अवस्था ङ्गार वाईट असल्याचे पाहिले आणि उत्तर प्रदेश सरकारने ही स्थिती सुधारली पाहिजे, असे आवाहन केले. त्यांनी या शिबिरात रहात असलेल्या मुस्लीम दंगल पीडितांनी आपापल्या घरी परत जावे असेही आवाहन केले.

राहुल गांधी यांच्या या भेटीबद्दल मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. राहुल गांधी यांना दंगल पीडितांची पाहणी खरोखरच करायची होती की, त्यातून राजकारण साधायचे होते याबद्दल आपल्याला शंका आहे. मात्र राहुल गांधी यांच्या या भेटीचे विश्‍लेषण आता पत्रकारांनीच करावे असे आवाहन त्यांनी केले. यापेक्षा अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

या शिबिरात राहणार्‍या लोकांची अवस्था वाईट असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचा आधार घेत राहुल गांधी यांनी या शिबिरांना भेट दिली आणि आपण ङ्गार व्यथित झालो आहोत असे प्रतिपादन केले. आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. या जिल्ह्यातल्या कोणालाच जातीय वैर नको आहे असे आपल्याला आढळले असल्याचे राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Leave a Comment