झहीर, शमीच्या अचूक माºयाने जोहान्सबर्ग कसोटी अखेर अनिर्णीत

जोहान्सबर्ग – भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधील पहिली कसोटी अखेर अनिर्णीत राहिली. दोन्ही संघांनी या कसोटीत हातातोंडाशी आलेली विजयाची संधी वाया दवडली. भारताने विजयासाठी दिलेल्या ४५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पाचव्या दिवसअखेर सात बाद ४५० धावांची मजल मारता आली.

ड्यू प्लेसी आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनी वैयक्तिक शतके झळकावलीच, पण त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०२ धावांची भागीदारी रचून दक्षिण आफ्रिकेला विजयाचे स्वप्न दाखवले होते. पण अखेरच्या काही षटकांत भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजीला वेसण घातल्याने हे स्वप्न भंगलं. यजमानांना विजयासाठी १९ चेंडूंत अवघ्या १६ धावांचे आव्हान होते. पण प्लेसी धावचीत झाला आणि कसोटीला कलाटणी मिळाली. त्यानंतर स्टेन आणि फिलँडरने अनुक्रमे शमी आणि झहीरचे षटक निर्धाव खेळून काढले आणि भारताने हा सामना अनिर्णीत राखण्यात यश संपादन केले.

Leave a Comment