हट योगा नव्हे ‘हॉट’ योगा

अमेरिकन टेनिसपटू ऍन्ड्री मरे याला आपल्या ङ्गिटनेसबद्दल काही शंका यायला लागली होती. त्यामुळे आपला खेळ चांगला होईल की नाही, याबद्दल तो चिंतित झाला होता. मात्र त्याने त्यावेळी एक उपाय शोधून काढला आणि एक महिनाभर हॉट योगाची प्रॅक्टिस केली. त्या हॉट योगामुळे त्याचे वजन घटले आणि तो खेळायला एकदम ङ्गिट झाला. तसा तो पाच वर्षांपासून हॉट योगाचा अभ्यास करत आहे. परंतु मधल्या काळात त्यात खंड पडला. त्यामुळे पुन्हा शरीर सुस्त व्हायला लागले आणि आता त्याने हॉट योगाची प्रॅक्टिस करून शरीर चुस्त करून टाकले आहे. एखादी नामवंत व्यक्ती योगाचा अभ्यास करते तेव्हा योगाविषयीची उत्सुकता वाढीला लागते.

योगाभ्यासाविषयी पाश्‍चात्य जगामध्ये त्यातूनच उत्सुकता निर्माण झालेली आहे. परंतु आता केवळ योग नव्हे तर हॉट योग म्हणजे काय? याविषयीची जिज्ञासा जागृत झाली आहे. आपल्याला हट योग हा शब्द माहीत आहे, परंतु हॉट योग म्हणजे काय हे माहीत नाही. हॉट योग ही एक वेगळी थेरपी आहे. तिच्यामध्ये योगासनेच केली जातात, परंतु ती ४० अंंंंश तापमानाला केली जातात. त्यामुळे त्या योगाभ्यासाला हॉट योग नाव पडलेले आहे. विक्रम चौधरी या भारतीय योग तज्ज्ञाने ही कल्पना यशस्वीरित्या राबवली आहे. तिच्यामध्ये ४० अंश तापमानात एका विशिष्ट क्रमाने २६ योगासने केली जातात आणि दोन प्रकारचे प्राणायाम केले जातात.

हा सारा प्रकार ९० मिनिटांचा असतो. त्यातला २६ आसनांचा क्रम ठरलेला आहे. तो असा – प्राणायाम, अर्धचंद्रासन, उत्कटा सन, गरुडासन, दंडायमान जानुशिरासन, दंडायमान धनुरासन, तुलादंडासन, दंडायमान विभक्तपाद त्रिकोणासन, दंडायमान विभक्तपाद, ताडासन, पादांगुष्ठासन, शवासन, पवन मुक्तासन, पादहस्तासन, भुजंगासन, शलभासन, पूर्ण शलभासन, धनुरासन, सुप्त वज्रासन, अर्ध कुर्मासन, उष्ट्रासन, शषांगासन, जानुशिरासन, अर्धमत्सेंद्रासन आणि कपालभाती. विक्रम चौधरी यांनी २००६ साली हा प्रकार सुरू केला आणि विलक्षण लोकप्रिय सुद्धा केला. त्यांनी सुरुवातीच्या काळात योगा कॉलेज सुरू केले आणि नंतर विविध देशांमध्ये योग स्टुडिओ सुरू केले.

आता जगभरात त्यांचे १६५० योग स्टुडिओ आहेत. जगातले अनेक खेळाडू नर्तक-नर्तिका आणि अभिनेते-अभिनेत्री असे अनेक सेलिब्रिटिज् या हॉट योगाचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी या योगाला विक्रम योग असे नाव दिले आहे. विक्रम चौधरी यांनी आपल्या या कल्पनेचे पेटंट घेतले आहे. परंतु त्यांच्या या पेटंटला बर्‍याच लोकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे कोर्टबाजी सुरू झाली. योगासने हा भारतीय ऋषीमुनींनी विकसित केलेला व्यायाम प्रकार आहे. त्यावर कोणाचाही मक्तेदारीचा अधिकार असू शकत नाही. त्यामुळे विक्रम चौधरी यांनी घेतलेले हे पेटंट बेकायदा आहे, असा आक्षेप काही योगशिक्षकांनी घेतला आणि त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर पाच वर्षे न्यायालयीन कामकाज झाले. शेवटी विक्रम चौधरी याला आपले हे पेटंटचे अधिकार सोडून द्यावे लागले. मात्र हॉट योगाचे प्रशिक्षण देणार्‍या कोणत्याही संस्थेला विक्रम योग हे नाव वापरता येणार नाही, असेही न्यायालयाने बजावले. त्यामुळे आता विक्रम चौधरी आपल्या योगासनाच्या या विशिष्ट पद्धतीला हॉट योगा म्हणण्याच्या ऐवजी विक्रम योग म्हणत आहेत.

विक्रम चौधरी हे योगाच्या प्रसाराला वाहिलेले व्यक्तिमत्व आहे. १९४६ साली कलकत्त्यात जन्मलेले विक्रम चौधरी यांनी १९७० च्या दशकामध्ये म्हणजे ङ्गारच कमी वयात योगशिक्षक म्हणून नाव कमावले. वयाच्या तिसर्‍या वर्षापासून योगासने करणार्‍या विक्रम चौधरी यांनी वयाच्या २० व्या वर्षापर्यंतच देशातली योग स्पर्धेतली अनेक बक्षिसे मिळवली होती. २००२ साली ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी तिथून विक्रम योगाचा शोध लावून त्याचा जगभर प्रचार केला. अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लासेस चालतात आणि त्यांच्या क्लासमध्ये बरेच नामवंत लोक भारी ङ्गी देऊन सहभागी होत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment