करिना पाकच्या मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर

बॉलीवूडची आघाडीची नायिका करिना कपूर पाकिस्तानच्या एका मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर झाली आहे. पाकिस्तानमधल्या सर्वात लोकप्रिय अशा ‘क्यू मोबाईल’शी काही दिवसांपूर्वी करीनाने करार केला आहे. त्यामुळे लवकरच करीना ‘क्यू मोबाईल’च्या जाहिरातीत झळकणार आहे.

आगामी काळात येत असलेल्या तिच्या जाहिरातीच्या शुटींगचे काम पूर्ण झाले आहे. थायलंडमध्ये या जाहिरातचे चित्रीकरण झाल्याची माहिती ‘क्यू मोबाईचा’ मार्केटींग अधिकारी जीनाश कुरेशी याने दिली आहे. ही मोबाईल क्षेत्रातील ही सर्वांत महागडी जाहिरात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या माध्यमातून करिनाचा पाकिस्तानातही मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. असल्यामुळे तिची या जाहिरातीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या या पाकिस्तानी चाहत्यांना खूश करण्यासाठी करिना सज्ज झाली. त्यामुळे आता आगामी काळात या जाहीरातीला कसा प्रतिसाद लाभतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment