मंगलोर – कर्नाटकात एकेकाळी खळबळ उडवून दिलेल्या सीरियल किलरला मृत्यूदंडाची शिक्षा ङ्गर्मावण्यात आली आहे. मंगलोरचे चौथे सत्र न्यायाधीश बी.के. नाईक यांनी ही शिक्षा ङ्गर्मावली. हा सीरियल किलर लोकांना सायनाईडचे इंजेक्शन देऊन मारत असे आणि त्यामुळे राज्यात खूप खळबळ माजलेली होती.
त्याने अनेकांना यमसदनाला पाठवले आहे. परंतु त्यापैकी तीन खून सिद्ध झाल्यामुळे त्या खुनाच्या प्रकरणात त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. या तिघामध्ये एक महिला होती आणि ते तिघेही मंगलोर जिल्ह्यातले होते.
या खुन्याचे नाव मोहनकुमार असे असून त्याला २००९ च्या ऑक्टोबरमध्ये पकडून त्याच्यावर खटला भरण्यात आला होता. २०११ साली त्याच्यासाठी जलद गती न्यायालय नेमण्यात आले आणि या न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली. न्यायाधीश श्री. बी.के. नाईक यांनी मोहनकुमार याचे हे कृत्य दुर्मिळात दुर्मिळ असल्यामुळे त्याला ङ्गाशीची शिक्षा सुनावणे योग्य आहे असे प्रतिपादन केले.