शाकाहारी हृद्रोगापासून दूर

vegसध्या जगात शाकाहाराची क्रेझ आलेली आहे. मुळात मोठ्या संख्येने शाकाहार असलेले भारतीय लोक हळू हळू मांसाहाराकडे वळत आहेत. परंतु अमेरिका, ब्रिटन अशा सुधारलेल्या देशातील लोक मुख्यत्वे मांसाहारी असूनही हळू हळू शाकाहाराकडे वळत आहेत. शाकाहाराचे नेमके ङ्गायदे काय आहेत याबाबत ङ्गार सखोल संंशोधन झालेले नसले तरी रक्तदाब, हृदयविकार आणि शरीरातील चरबीचे प्रमाण वाढणे या गोष्टींपासून शाकाहारामुळे सुटका होते असे सर्वसाधारण पणे मानले जाते. अर्थात त्याला संशोधनाचा आधार नसल्यामुळे काही लोकांचा या गोष्टीवर विश्‍वास नव्हता. शाकाहार करावा की मांसाहार करावा हे ज्यांनी त्यांनी आपापल्या मनाच्या कलानुसार ठरवलेले होते. परंतु आता मात्र अमेरिकेतल्या ऑक्सङ्गर्ड विद्यापीठातल्या एका संशोधनामध्ये असे आढळले आहे की, मांसाहार करणार्‍या लोकांमध्ये हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते आणि शाकाहार करणार्‍यांमध्ये हे प्रमाण ३२ टक्क्यांनी कमी असते. म्हणजे शाकाहार करणार्‍यांना हृदय विकाराचा झटका येण्याची तेवढी शक्यता कमी असते.

या संबंधात काही मासांहारी लोकांचा आणि शाकाहारी लोकांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. अशा प्रकारचा हा अभ्यास आणि निरीक्षण प्रदीर्घ काळ करण्यात आला. ते करण्यासाठी ऑक्सङ्गर्ड विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी इतर काही संस्थांची मदत घेतलेली होती. या प्रयोगामध्ये जवळपास ४५ हजार लोक सहभागी झाले होते. इंग्लंड आणि स्कॉटलंड मधील हे लोक होते. हा प्रयोग करताना शाकाहारी लोक सापडणे मुश्कील झाले होते. कारण या दोन देशांमध्ये आयुष्यात कधीच मांसाहार केला नाही असे लोकच सापडत नव्हते. परंतु बराच प्रयत्न करून त्यांचा शोध घेण्यात आला आणि या शोधाअंती १५ हजार शाकाहारी लोक सापडले. हे लोक असे होते की, त्यांनी आयुष्यात अगदी अपवादात्मक प्रसंगात मांसाहार केलेला होता. त्यांच्या आहारामध्ये मांसाहार नव्हताच. तर अशा या लोकांची आणि नित्य मांसाहार करणार्‍या लोकांची तुलना करण्यात आली. मात्र हा तुलनात्मक अभ्यास ङ्गारच प्रदीर्घ काळ चालणारा होता.

जवळपास १२ वर्षे या ४५ हजार लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, त्यांचे वजन, बॉडी-मास इंडेक्स आणि त्यांना होणारे वेगवेगळ्या प्रकारचे विकार यांच्या नोंदी सातत्याने घेण्यात आल्या. या अभ्यासाचे निष्कर्ष संशोधक प्राध्यापक टीम की यांनी जाहीर केले. ते जाहीर करण्याची पद्धत पूर्णपणे शास्त्रशुद्ध असल्यामुळे ती भाषा आणि त्यातले शब्दप्रयोग सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाणारे आहेत. कारण ते सांगत असताना ङ्गार सावधगिरी बाळगावी लागते. शाकाहार केल्याने हृदयविकार होत नाही आणि मांसाहार केल्याने तो होतो, अशा प्रकारचे ढोबळ विधान करता येत नाही. म्हणून त्यांनी ङ्गार सावधपणाने आणि नेमकेपणाने असे जाहीर केले की, शाकाहारी व्यक्तींमध्ये हृदयविकार होण्याचा धोका मांसाहारी व्यक्तींपेक्षा ३२ टक्क्याने कमी असतो. हे आपण नीट समजून घेतले पाहिजे.

मांसाहार करणे हे हृदयविकार होण्याचे एकमेव कारण नाही. तेव्हा शाकाहार करणार्‍यांपैकी काही लोक लठ्ठ असतील, सतत एका जागी बसून काम करत असतील, सिगारेट ओढत असतील, मद्यपान करत असतील तर अशा लोकांना हृदय विकार होणारच आहे. ते शाकाहारी आहेत एवढ्या एका कारणावरून त्यांचा हृदयविकार टळणार नाही. मात्र अशा सगळ्या सवयी असणार्‍या मांसाहारी व्यक्तीला हृदयविकार होण्याची जेवढी शक्यता असते तेवढी ती अशा सवयी असणार्‍या शाकाहारी माणसांत नसते. एकंदरीत शाकाहारामुळे हृदय विकार होण्याची शक्यता कमी होते. एकंदरीत निष्कर्ष काहीही असले तरी मांसाहारापेक्षा शाकाहार बरा, अशा सोप्या शब्दामध्ये या प्रचंड मोठ्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगता येऊ शकतो आणि तसा तो सांगणे अशास्त्रीय सुद्धा ठरत नाही. मांसाहारा मध्ये सुद्धा कोणता मांसाहार केला जातो यावरही हृदयविकार अवलंबून असतो.

Leave a Comment