नवी दिल्ली – पाटणा आणि बोधगया मंदिरात झालेल्या साखली बॉम्बस्फोटाचे प्रकरण निकालात निघाल्याचे, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (गुरूवार) सांगितले. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे रांची मॉड्युल या स्फोटामागे असल्याचे उघड झाले आहे.

पाटणात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी झालेल्या स्फोटातही याच गटाचा सहभाग होता. या स्फोटाशी संबंधित सर्व जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. बोधगया मंदिरात 7 जुलैला दहा स्फोट झाले होते. तर, पाटणात आठ साखळी स्फोट झाले होते. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता.