नवी दिल्ली – स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांचा अंधश्रद्धेवर विश्वासची चर्चा होती. अखेर हे दोघेही घालत असलेल्या लाल टोपी आणि डोळ्यात घालत असलेल्या काजळामागे अंधश्रद्धा असल्याचेच उघड झाले आहे.

आसाराम बापूंचे माजी सेवक राहुल सचान यांनी याबाबत खुलासा करताना म्हटले आहे, की आसाराम बापू आणि नारायण साई हे काळ्या जादूचे प्रतीक असलेली लाल टोपी घालतात. तसेच कोणाची नजर न लागल्यासाठी डोळ्यात काजळ घालतात. या दोघांनी आतापर्यंत अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून कारागृहाबाहेर येण्याची या दोघांना खात्री आहे. त्यामुळे हे दोघेही हे सर्व करत आहेत. आसाराम बापू आणि नारायण साई घालत असलेल्या लाल टोप्यांवर सव्वा लाख मंत्राचा जप करण्यात आल्याचे, राहुल सचान यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून या काळ्या जादूचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.