मोदींनी दाढी-मिशी काढावी – चित्रांगदा सिंह

बंगळुरू- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर सिने तारकाही फिदा झाल्या असून अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिने तर मोदींना लुक बदलण्याचाच सल्ला देऊन टाकला आहे. मोदी हे दाढी आणि मिशीशिवाय आणखी आकर्षक दिसतील, असं चित्रांगदाबाईंचं म्हणणं आहे.

देशाचे भावी पंतप्रधान मोदीच असतील अशी स्वप्नं भाजपच्या मंडळींना पडत असताना मोदींची जादू बॉलिवुडमध्येही दिसत आहे. याआधी अभिनेत्री मल्लिका शेरावत हिनेही मोदींची स्तुती केली होती. मोदी हे ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ असल्याचं विधान मल्लिकाने केलं होतं.

आता चित्रांगदानेही तिच्या पावलावर पाऊल ठेवत मोदींवर स्तुतीसुमने उधळलीत. ‘राहुल यांच्यात मला पंतप्रधानपदाचा उमेदवार दिसत नाही. माझी पहिली पसंती मोदींनाच आहे. मात्र, मोदी यांनी आपला लुक थोडा बदलायला हवा. त्यांनी दाढी-मिशी काढली तर ते आणखी सुंदर दिसतील,’ असे चित्रांगदा म्हणाली. तुम्ही शीख असाल तर धार्मिक कारणामुळे तुम्हाला दाढी ठेवावी लागते, मात्र मोदींच्या बाबतीत तसं काहीच नाही, असंही चित्रांगदा पुढे म्हणते.

Leave a Comment