पूर्ण न होणारी आश्वासने जनतेला देऊ नका- पंतप्रधान

नवी दिल्ली – आगामी काळात निवडाणूका होत असल्याने पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पूर्ण न होणारी आश्वासने जनतेला देऊ नका असे आवाहन काँग्रेस नेत्यांना केले आहे. ते दिल्लीत बोलत होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आवाहन केल्या ने आगामी काळात जनतेला आश्व सन देण्यादचे प्रमाण कमी होईल असे वाटते.

यावेळी बोलताना पंतप्रधान मनमोहनसिंग म्हहणाले ‘जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होत नसतील तर तशी आश्वासने देऊ नका, पूर्ण होतील अशीच आश्वासने जनतेला द्या. काही राजकीय पक्ष पूर्ण न होणारी आश्वासने देत आहेत. गेल्या दहा वर्षातील कामे जनतेपर्यंत पोहोचवा’. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपण सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय २३ डिसेंबरला जाहीर करु असे सांगितले. यासाठी आपने जनतेचा कौल घेण्याचेही ठरविले आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांनी संसदेतील काँग्रेसच्या नेत्यांना उद्देशून हे वक्तव्य केले.

यावेळी कॉग्रेसच्यां पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अपयशाने खचून जाऊ नका असे सांगितले. आम्ही काम केले पण तरीही आम्ही हरलो कारण जनतेपर्यंत आमची कामे पोहोचली नाही असे त्यांनी सांगितले. महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर मंजूर झाले पाहिजे असे त्या म्हणाल्या. पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणूकीत चार राज्यात काँगेसचा पराभव झाला. दरम्यान आपने काँग्रेससमोर १८ अटी ठेवल्या आणि त्या काँग्रेसने अटींवर उत्तर दिल्यानंतर आता पुन्हा आपने जनतेचा कौल घेण्याचे ठरविले आहे.

Leave a Comment