फोब्र्जतर्फे पुण्यात बॉयलर उत्पादन

पुणे : बेल्जियममधील विन्क या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्याने पुण्यातील फोर्ब्ज मार्शल समूहाने चाकणमध्ये २ ५ ० कोटी रुपये गुंतवणूक करून बॉयलर उत्पादन प्रकल्प उभारला असल्याची घोषणा फोर्ब्ज मार्शलचे संचालक नौशाद फोर्ब्ज आणि विन्क समूहाचे मुख्याधिकारी पीटर विन्क यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

सध्या पुणे मुंबई रस्त्यावर असलेले सर्व उत्पादन टप्प्याटप्प्याने चाकणमधून होणार असल्याचे नमूद करून फोर्ब्ज म्हणाले की पहिल्या टप्प्यात २ ५ ० कोटी आणि नंतर आणखी १ ० ० कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. दोन्ही कंपन्यांनी ५ ० – ५ ० टक्के भांडवल गुंतवले आहे . अत्यंत अत्याधुनिक, वापरण्यास सुलभ आणि कार्यक्षम बॉयलर येथे उत्पादन केले जाणार आहेत. ५ ० ० किलो प्रतितास जैविक घटक प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले बॉयलर तयार केले जात आहेत. ही क्षमता २ ५ टन प्रतितास इतकी वाढवता येणार असून बाजाराच्या मागणीनुसार ते केले जाणार आहे . आमचे बॉयलर वापरल्याने तेल आणि वायू उद्योगाची तीन ते पाच वर्षात खर्चात ३ ० टक्के बचत होणार आहे तसेच पर्यावरण जपले जाणार आहे. नव्या प्रकल्पामुळे १ ० ० जणांना थेट रोजगार मिळाला असून येत्या दोन महिन्यात ही संख्या २ २ ० होईल .

ब्रिटीश कंपनीच्या मदतीने एमिशन मॉनीटर यंत्रे , सौर उर्जा प्रकल्पास लागणारी यंत्रे आणि कागद उद्योगाला लागणारे हूड असे नवे व्यवसाय चाकण प्रकल्पातून केले जाणार आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की महाराष्ट्र सरकारने मेगा प्रोजेक्ट दर्जा दिल्याने पुढील सात वर्षात भांडवली खर्चाच्या ७ ५ टक्के रकमेचा परतावा आम्हाला मिळेल.

मुख्याधिकारी पीटर विन्क म्हणाले की आम्ही भारतात पाच वर्षापूर्वी आलो. भारतात व्यवसाय करणे हे एक आव्हान आहे आणि येथील बाजारपेठ मोठी असल्याचे जाणवले. थायलंड मध्ये एका भारतीय उद्योजकाने आम्हाला स्पर्धेत मागे टाकल्याने भारत किती प्रगती करू शकतो हे आम्हाला समजले.
नवी कंपनी बनवत असलेले बॉयलर रसायने, दुध व्यवसाय, पोलाद, अन्न पदार्थ प्रक्रिया, औषधे मद्यार्क, टायर उत्पादन, रबर , वस्त्रोद्योग अशा अनेक क्षेत्रात वापरले जातात आणि भारतात कृषी उद्योग मोठा असल्याने व्यवसाय वाढीस प्रचंड वाव आहे.