आगामी काळात अभिनेता अमिर खान याचा बहूचर्चीत ‘धूम-३’ हा सिनेमा येत आहे. यशराज फिल्म्स बॅनरचा सगळ्यात महागडा सिनेमा म्हआणून ‘धूम थ्री’ ची सर्वत्र ओळख झाली आहे. हा सिनेमा २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या ‘धूम’मध्ये आमिर खानने वेगळी भूमिका केली असल्यामुळे सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यशराज फिल्म्स बॅनरचा सिनेमा म्हणजे सुनियोजित फिल्ममेकिंग, भव्य सेट्स, परदेशी शुटिंग स्थळे, निसर्गरम्य परदेशी चित्रण आणि बडय़ा कलावंतांचा सहभाग हे समीकरणच झाले आहे.प्रचंड पैसा खर्च करून अस्सल, व्यावसायिक परंतु सर्व प्रेक्षकांना कोणता ना कोणता मुद्दा सिनेमातील आवडावा अशा पद्धतीने रचना असलेले सिनेमेच आतापर्यंत यशराज फिल्म्स बॅनरने आतापर्यंत केले आहेत.
यशराजने सेट डिझाइन्स, रंगसंगती, चित्रीकरण स्थळे या सगळ्यामध्ये भव्यता असणे हे वैशिष्टय़ नेहमी जपले आहे. अनेक यशस्वी सिनेमे करूनही त्या सिनेमांचे सीक्वेल यशराजने केले नाहीत. परंतु, धूम २००४ साली आलेल्या सिनेमाच्या यशानंतर फक्त याच सिनेमाचा दुसरा भाग आणि या भागाच्या यशानंतर आता तिसरा भाग असे सीक्वेल केले आहेत हेही एक वैशिष्टय़ म्हणता येईल. त्यामुळेच आगामी काळात येत असलेल्या या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.