नवी दिल्ली – २०१४ चे चित्र विस्कळीत असेल. २०१४ ला निवडून आलेले सरकार वर्ष सहा महिनेच टिकेल. वर्षभरात पुन्हा निवडणुकांची शक्यता असेल, असे भाकित केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

युपीए तीनबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. २०१४ चे चित्र विस्कळीत राहणार असल्याचे भाकित पवारांनी करताना सांगितले की, २०१४ ला निवडून आलेले सरकार वर्ष सहा महिनेच टिकणार आणि वर्षभरात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी युपीए तीनच्या भविष्याबाबतही साशंकता व्यक्त केली आहे.
केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज गुरूवारी (दि.१२) वाढदिवस आहे. या वाढदिनी असे भाकित केल्याने राजकीय वर्तुळाच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दिल्लीतील त्याच्या निवासस्थानी अगदी साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी दिल्लीतील अनेक जेष्ठ नेते आणि मान्यवरांनी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली.