क्रिकेटपटू श्रीशांत अडकला लग्नाच्या बेडीत

तिरुअंनतपूरम- गेल्याळ काही दिवसांपूर्वी स्पॉट फिक्सिंगच्या फे-यात अडकलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत आता गुरूवारी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. केरळमधील गुरूवायूर येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये केरळी पद्धतीने जयपूर येथील ज्वेलरी डिझायनर भुवनेश्वरी कुमारी हिच्याशी त्याचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेऋातील मान्य वरांनी हजेरी लावली.

बुधवारी कोची येथील एका हॉटेलमध्ये राजस्थानी पद्धतीने क्रिकेटपटू एस. श्रीशांत- ज्वेलरी डिझायनर भुवनेश्वरी कुमारी यांच्या्वर विवाह संस्कार करण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वी जयपूर येथे भारत-पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रीशांत व भुवनेश्वरी कुमारी पहिल्यांदा भेटले होते. त्यांच्या या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यावेळ त्यांनी विवाह करण्याचे ठरविले होते.

गेल्यावर्षी स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यात अडकण्याआधी श्रीशांतने त्याच्या लग्नाची घोषणा केली होती. मात्र, काही काळ स्पॉट फिक्सिंगप्रकरणी जेलमध्‍ये अडकल्याने विवाह लाबंणीवर पडला होता. या सोहळ्यासाठी श्रीशांत व भुवनेश्वरी कुमारी यांचे कुटुंबीय व आप्तेष्ट हजर झाले होते.

Leave a Comment