रोल्स राईस घेणारी प्रियंका चोप्रा पहिली अभिनेत्री

मुंबई- बॉलीवूडची आघाडीची नायिका प्रियांका चोप्रा ही रोल्स राईस कार खरेदी करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे. त्यासाठी तिने २ कोटी रूपये मोजले आहेत शिवाय गाडीचे इंटिरियर आपल्या पसंतीचे करण्यासाठी ती वेगळी रक्कम मोजणार आहे असे समजते.

प्रियांकाला महागड्या गाड्यांचा अतिशय शौक आहे. तिच्याकडे आत्ताच कितीतरी गाड्या आहेत. पैकी कॅनिन ही दीड कोटीची, मर्सिडीज ई क्लास १.२९ कोटी, बीएमडब्ल्यू सात १.७८ कोटी अशा महागड्या गाड्या तिच्याकडे आहेत. रोल्स राईस साठी तिने सप्टेंबरमध्येच बुकींग केले होते मात्र या गाडीची डिलिव्हरी तिला फेब्रुवारीत मिळणार आहे.