कॉंग्रेससाठी धडा

चार राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपण २००९ सालपेक्षा चांगले यश मिळवू शकतो अशा आशावाद या पक्षात जागा झाला आहे. जेव्हा एखाद्या पक्षाला विजय मिळतो तेव्हा त्याला कोणीही आत्मपरीक्षणाचा सल्ला देत नाही. पण कॉंग्रेसला मात्र आता आत्मपरीक्षणाची गरज आहे हे निश्‍चित. कारण कॉंग्रेसची पिछेहाट झाली आहे. ही निवडणूक म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीची सेमीङ्गायनल असल्यामुळे तिच्या निकालामुळे भाजपाच्या नेत्यांना आनंद झाला आणि तो स्वाभाविक आहे. मात्र त्यांनीही ङ्गार हुरळून जाता कामा नये. कारण या निवडणुकांमध्ये भाजपाची लाट दिसून आली आहे असे सरसकट म्हणता येत नाही. कॉंग्रेसच्या विरोधात लाट होती हे मात्र स्पष्ट दिसते. या निवडणुकीत कॉंग्रेसला विजय मिळाला असता तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी, ‘सेमीङ्गायनल जिंकली आणि आता ङ्गायनलही जिंकणार अशा घोषणा दिल्या असत्या’ परंतु आता हरल्यामुळे ही निवडणूक लोकसभेची सेमीङ्गायनल होऊ शकत नाही असे म्हणायला सुरूवात केली आहे. ती खरी सेमीङ्गायनल असो की नसो पण कॉंग्रेसला या निवडणुकीने धोक्याचा लाल कंदील दाखवलेला आहे. पण तरीसुध्दा कॉंग्रेसचे नेते आत्मपरीक्षण करतीलच अशी काही खात्री देता येत नाही. कारण निकालांचे विश्‍लेषण करताना तसे दिसत आहे. ते कितीही टाळाटाळ करत असले तरी त्यांनी विश्‍लेषण करून त्यापासून धडा घेतला नाही तर त्यांचे अधःपतन कोणीही रोखू शकणार नाही.

आता कॉंग्रेसचे नेते सारवासारव करत असले आणि हा आपला पराभवच नाही अशा कितीही शाब्दिक कसरती करत असले तरी मनमोहनसिंग यांचा कारभार, सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला भ्रष्टाचार आणि राहुल गांधीसारख्या अकार्यक्षम, पोरकट नेत्याला देशाचा नेता म्हणून उभा करण्याचा प्रयत्न यांचा परिणाम कॉंग्रेसला भोगावा लागला आहे. दिल्लीमध्ये हा पक्ष तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे. मध्य प्रदेशात त्याच्या पाच जागा कमी झाल्या आहेत आणि राजस्थानमध्ये २०० पैकी जेमतेम ३० जागा मिळून या पक्षाने सत्ता गमावलेली आहे. आता कॉंग्रेसच्या नेत्यांचा युक्तिवाद ऐकला म्हणजे त्यांची कीव कराविशी वाटते. त्यांच्या मते मध्य प्रदेशातला आपला पराभव म्हणजे खरा पराभव नव्हेच कारण तिथे भाजपाचेच सरकार होते. परंतु गेल्या १५ वर्षांमध्ये मध्य प्रदेशातल्या कॉंग्रेसच्या संघटनेतली गटबाजी संपवण्यात पक्षाला यश आलेले नाही आणि राज्याचा कॉंग्रेसचा एकमेव नेता म्हणून कोणालाही पुढे आणता आले नाही ही वस्तुस्थिती आहे.

मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहेच. पण राजस्थानमध्येसुध्दा कॉंग्रेसची स्थिती केविलवाणी झाली आहे. तिथे वसुंधराराजे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला जवळपास तीन चतुर्थांश बहुमत मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आता राजस्थानमधला पराभव म्हणजेसुध्दा कॉंग्रेसच्या कानङ्गाटात मतदारांनी मारलेली चपराक आहे. पण तिथेही प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण न करता कॉंग्रेसचे नेते तिथे आलटून पालटून सत्ता बदलत असतेच तशी कॉंग्रेसची सत्ता गेलेली आहे असे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण मांडून मनाचे समाधान करून घेत आहेत. राजस्थानमध्ये आलटून पालटून सत्ता देण्याचा काही नियम नाही. तिथे अशोक गेहलोत यांचा कारभार चांगलाच होता. तर सलग दोनदा विजय का मिळाला नाही? आलटून पालटून सत्ता देण्याची परंपरा त्यांना का खंडित करता आली नाही. या प्रश्‍नाची उत्तरे कॉंग्रेसने शोधली पाहिजेत. राजस्थानमधला कॉंग्रेसचा पराभव हा कॉंग्रेससाठी अधिक मानहानीकारक आहे. कारण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी राजस्थानवर अधिक भर दिलेला होता आणि म्हणूनच असेल कदाचित पण राहुल गांधी प्रचार करतात तेव्हा कॉंग्रे्रसचा नेहमीच लाजिरवाणा पराभव होत असतो.

तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेशात या तीन राज्यात राहुल गांधी यांची ही कर्तबगारी पुरतेपणी सिध्द झालेली आहे. त्यामुळे तिथे अशोक गेहलोत यांच्या सरकारला अक्षरशः धोबीपछाड मिळालेली आहे. देशाचे नाक समजली जाणारी दिल्ली विधानसभा तर कॉंग्रेससाठी ङ्गारच धक्कादायक ठरली आहे. तिथे कॉंग्रेसचा क्रमांक तिसरा लागला आहे. एवढेच नव्हे तर तिसरा क्रमांक पटकावताना एक आकडी म्हणजे दहा पेक्षा कमी आमदार मिळालेले आहेत. शीला दीक्षित यांचा पराभव होईल असे कधी वाटले नव्हते. परंतु अशोक गेहलोत आणि शीला दीक्षित या दोघांना आपापले मतदारसंघसुध्दा राखता आले नाहीत. तिथले कॉंग्रेसचे सरकार पराभूत होणार असा संकेत राहुल आणि सोनिया गांधी यांच्या सभामधील उपस्थितीवरून मिळतच होता. परंतु एवढे अपमानास्पद स्थिती असे कधी वाटले नव्हते. तिथे आम आदमी पार्टीने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. एवढेच नव्हे तर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातही ती एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. पूर्वी पंचायतीची निवडणूकसुध्दा न लढवलेल्या अरविंद केजरीवाल यांनी ५० वर्षे राजकारणात असलेल्या शीला दीक्षित यांना त्यांच्या मतदार संघातही धूळ चारली आहे आणि विधानसभेतही पराभूत केले आहे. कॉंग्रेसचे नेेते या सार्‍या पराभवाच्या पर्वात छत्तीसगडमधल्या आपल्या कामगिरीबद्दल थोडासा दिलासा बाळगू शकतात परंतु कॉंग्रेसला सार्‍या परिस्थितीचा नीट विचार करावा लागणार आहे.

Leave a Comment