अजय देवगण-करीना करणार रोमान्स

आगामी काळात येत असलेल्या सिनेमात बॉलीवुडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री असलेली करीना कपूर पुन्हा एकदा सिंघम स्टार अजय देवगन सोबत सिल्वर स्कीनवर रोमान्सल करताना दिसणार आहे. बॉलीवुडमध्ये चर्चा आहे की, आगामी काळात दिगदर्शक रोहित शेट्टी त्याचा सुपरहिट सिनेमा “सिंघम”चा सीक्वल तयार करीत असून त्या सिनेमातून अजय-करीनाची जोडी झळकणार आहे.

या सिनेमात अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिका करताना दिसणार आहे. रोहित या सिनेमासाठी अजय देवगणच्या अपोजिट अभिनेत्रीचा शोध घेत होता. आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात अजयच्या अपोजिट अभिनेत्री म्हाणून करीना कपूर काम करणार आहे.

अभिनेता अजय देवगन आणि करीना कपूर या दोघांची जोडी यावर्षी आलेल्यान “ओमकारा”, “गोलमाल रिटर्न”, “गोलमाल-३” आणि “सत्याग्रह” या सिनेमातून झळकताना दिसणार आहे. “सिंघम-२” या सिनेमात करीना कपूरसाठी रोहित शेट्टीने पावारफुल रोल लिहला आहे. सिंघम-२ या सिनेमाची शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे.

Leave a Comment