सिडनेत पुन्हा दिसल्या उडत्या तबकड्या

मेलबर्न – माऊंट अॅनान या सिडनेतील भागात रविवारी रात्री चार उडत्या तबकड्या पाहिल्याचे स्थानिक व्यावसायिक महिलेने कळविले असून तिने या तबकड्यांच्या प्रतिमा प्रसिद्धीस दिल्या आहेत.

या महिलेने दिलेल्या माहितीनुसार १ डिसेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास ही महिला तिच्या कुटुंबियांसमवेत बसली असताना आकाशात गूढ प्रकाश दिसला. बाहेर येऊन पाहिले असता आकाशात खूप उंचावर हिरवी प्रकाशमान तबकडी त्यांनी पाहिली. गोलाकार आकाराची ही तबकडी संथ वेगाने मात्र अजिबात आवाज न करता कँपबेल टाऊनकडून कास्काडोसकडे जाताना दिसली. तिच्या पाठोपाठ पांढर्‍या चकचकीत रंगाची छोटी तबकडीही दिसली. तीही याच मार्गाने जात होती. दरम्यान या महिलेने कॅमेरा आणला तेव्हा लाल रंगाची आणखी एक तबकडी त्यांना दिसली व पुन्हा पांढर्‍या रंगाची चौथी तबकडीही त्यांनी पाहिली. या तबकड्या मात्र दुसर्या. मार्गाने मार्गक्रमणा करत होत्या असे तिचे म्हणणे आहे.

Leave a Comment