पर्यटन क्षेत्रात ऑस्करच्या तोडीचे मानले जाणारे लिडिंग आयलड डेस्टीनेशन हे मानाचे अॅवार्ड मालदीवने यंदा सलग तिसर्याड वेळी पटकावले आहे. २०१३ सालासाठी हे वर्ल्ड ट्रॅव्हल अॅवार्ड जाहीर केले गेले आहे. कतार येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष समारंभात ही पारितोषिके जाहीर केली गेली आहेत.
या पारितोषिकासाठी मालदीवला इंडोनेशियातील बाली, बाबा्रडोस, कुक आयलंड, ग्रीसमधील क्रीक, जमैका, सेशेल्स, माडेरिया आयलंड, र्मारिशस, इटलीतील सिसिली, सेंट लुसिका, झांझिबार या बेटांबरोबर स्पर्धा करावी लागली. विशेष म्हणजे विविध श्रेणींसाठी देण्यात येणारी अनके पारितोषिक मालदिवनेच पटकावली आहेत. मालदिवमधील हुलहुले आयलंड वर्ल्ड लिडिंग एअरपोर्ट रिसॉर्ट म्हणून निवडले गेले तर रंगाली आयलंड जगातले लिडिंग वॉटर व्हिला रिर्सार्ट म्हणून निवडले गेले. बारोस मालदिव हे जगातील सर्वाधिक रोमँटिक डेस्टीनेशन म्हणून निवडले गेले आहे.
मालदीवचे पर्यटन मंत्री अहमद अदीव या संदर्भात बोलताना म्हणाले की मालदिवमध्ये गेला कांही काळ राजकीय उलथापालथ सुरू असून त्यामुळे अशांतता आहे तरीही गेल्या महिन्यात येथे १० लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. पुढच्या वर्षापासून पर्यटक पुन्हा एकदा मोठ्य संख्येने मालदीवला भेट देतील अशी अपेक्षा आहे.