नेल्सन मंडेला यांचे निधन

जोहान्सबर्ग – दक्षिण आङ्ग्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष आणि वर्णभेदविरोधी लढ्यातील जागतिक राजकारणातील अग्रणी नेते नेल्सन मंडेला यांचे भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे जोहान्सबर्ग येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते आणि ङ्गुफ्ङ्गुसाच्या कर्करोगाने अंथरुणावर खिळून होते. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल जगातील अनेक मान्यवर नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

नेल्सन मंडेला हे दक्षिण आङ्ग्रिकेतल्या वर्णविद्वेषी राजवटीच्या विरोधात प्रखरपणे उभारलेल्या लढ्याचे नेते होते आणि त्यांनी या लढ्याचा एक भाग म्हणून तीस वर्षे तुरुंगवास सहन केला होता. त्यांच्या या लढ्यामुळे त्यांना जगभरात उपेक्षितांचा नेता म्हणून ओळखले जाते. गेल्या जूनमध्ये ते अतिशय नाजूक स्थितीत रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते आणि घरीच त्यांच्यावर अति दक्षता विभागातील सर्व उपचार केले जात होते.

१९१८ साली दक्षिण आङ्ग्रिकेच्या ट्रान्स्की भागातील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. ते व्यवसायाने वकील होते. १९६१ साली त्यांनी आङ्ग्रिकन नॅशनल कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आणि परदेशात जाऊन लष्करी शिक्षण घेतले. त्या शिक्षणाचा वापर करून त्यांनी वर्णविद्वेषी सरकारच्या विरोधात लढा उभा केला, पण त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

१९९० साली ते मुक्त झाले. १९९४ साली दक्षिण आङ्ग्रिकेत खुल्या निवडणुका झाल्या, त्यात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. अध्यक्षपदाची एक टर्म पूर्ण केल्यानंतर त्यांनी ते पद सोडून दिले आणि राजकारणात राहून सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. २००४ साली त्यांनी राजकारण संन्यास घेतला. त्यानंतरचा त्यांचा बराच काळ आजारपणात गेला.