पाकची युद्धखोरी

पाकिस्तानने भारतावर लादलेल्या तीन पैकी तिन्ही युद्धात त्याचा पराभव झाला आहे. पण तरीही पाकिस्तान युद्धाचाच पुकारा करीत असते. तिथल्या जनतेचीच मनोधारणा काही वेगळी आहे. म्हणूनच तिथे लष्कराच्या हातात सत्ता गेली तरीही लोकांना ङ्गार काही वाईट वाटत नाही उलट बरेच वाटते. देशावर लष्कराचे राज्य असले तरच आपला देश भारताला पादक्रांत करून पूर्णपणे इस्लाममय करू शकेल असे त्यांना वाटते. बेनझीर भुट्टो यांनी भारताशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर तिची हत्या झाली पण पाकिस्तानातल्या जनतेला बरेच वाटले कारण ती भारताच्या विरोधात डरकाळ्या ङ्गोडत नव्हती. आता पंतप्रधान नवाज शरीङ्ग यांनी तो वसा पुढे चालवण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानचे नेते भारताशी शांततेच्या वाटाघाटीही करत असतात आणि दुसर्‍या बाजूला अशा अधुनमधुन युद्धाच्या डरकारळ्याही ङ्गोडत असतात. या डरकाळ्यामागे पाक नेत्यांचे हेतू निराळे असतात आणि जनता मात्र त्यातून वेगळाच संदेश घेत असते. जनतेला सतत ङ्गसवत ठेवण्यासाठी आजवरच्या सार्‍या पाक नेत्यांनी सतत लढाईच्या वल्गना केल्या आहेत. आता नवाज शरीङ्ग यांनीही आपल्या पूर्वसूरींचा आदर्श समोर ठेवत किंवा परंपरा जारी ठेवत भारताविरुद्ध युद्धाची भाषा सुरू केली आहे.

माजी पंतप्रधान झुल्ङ्गिकार अली भुट्टो यांनी तर भारताशी एक हजार वर्षे युद्ध करण्याची भाषा केली होती. हजार वर्षे युद्ध करण्याची भाषा करणारा हा देश देश म्हणून पुढची शंभर वर्षे तरी जगेल की नाही, अशी शंका वाटावी इतके गंभीर अंतर्विरोध तिथे आहेत. १९७१ साली या देशाचे दोन तुकडे झाले. पण अजूनही त्याची युद्धाची भाषा संपत नाही. या देशातल्या लोकांची मनोधारणा अशी काही विचित्र आहे की, त्यांना भारताच्या विरोधात सतत बोललेले आवडते. म्हणून पाकिस्तानातले लबाड नेते अधूनमधून भारताशी युद्धाची भाषा बोलून या युद्धखोर मन:स्थितीला गोंजारत असतात.पण याच नीतीचा एक भाग म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीङ्ग यांनी युद्धाची भाषा वापरताच आपल्याही पंतप्रधानांनी त्यांना चोख उत्तर दिले. पाकिस्तानने खुशाल युद्धाची भाषा करावी, परंतु आपल्या हयातीत तरी पाकिस्तान भारतावर विजय मिळवू शकणार नाही, असा सज्जड इशारा मनमोहनसिंग यांनी दिला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीङ्ग यांनी पाकिस्तानातल्याच डॉन या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकेल असे म्हटले. आपल्या हयातीत आपण जम्मू-काश्मीर हे भारतापासून विलग झालेले बघू इच्िछतो, असेही अकलेचे तारे नवाज शरीङ्ग यांनी तोडले.

त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भारताचे हे विघटन बघण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु पंतप्रधानांनी त्यांना तसेच उत्तर दिले आणि माझ्या हयातीत तरी पाकिस्तान भारतावर मात करू शकणार नाही असे प्रतिपादन केले. पंतप्रधान मनमोहनसिंग हे सौम्य बोलणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सातत्याने उगाच भडकावू विधाने करत नाहीत आणि एखाद्यावेळी विरोधकांनी ङ्गारच टीका केली तर तिलातिला मार्मिक शब्दात पण सौम्यपणे उत्तर देतात. तेव्हा त्यांचा आवाज सौम्य असला तरी शब्द मात्र घणाघाती असतात. खुबीदार शब्दयोजना असते. आताही नवाज शरीङ्ग यांनी त्यांच्या हयातीचा उल्लेख केला तेव्हा मनमोहनसिंग यांनीही आपल्या हयातीत त्यांना यश मिळणार नाही, असे तोडीस तोड उत्तर दिले. पाकिस्तानी नेत्यांना त्यांची राजकीय गरज म्हणून अशी भडकावू विधाने करावी लागतात. कारण गेल्या ६०-६५ वर्षांमध्ये तिथल्या राज्यकर्त्यांनी भारतद्वेष हाच राजकारणाचा पाया केलेला आहे. आपण भारताचे विभाजन घडवून आणले, परंतु तसे करण्याऐवजी पूर्ण भारतच जिंकायला पाहिजे होता असे मानणारा एक वर्ग पाकिस्तानात आहे आणि त्या धर्मांध नेत्यांना मानणारे लोकही तिथे आहेत. त्यामुळे या लोकांना राजी राखण्यासाठी पाकिस्तानचे नेते अधूनमधून जम्मू-काश्मीरवरून डरकाळ्या ङ्गोडत असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मुख्यत्वे तीन लढाया झाल्या आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९४८, १९६५ आणि १९७२ अशी तीन युद्धे झाली. १९४८ साली झालेल्या युद्धात भारताला विजय मिळाला असे निर्विवादपणे म्हणता येत नाही. पण पाकिस्तान्यांनी केलेली घुसखोरी मोठ्या प्रमाणावर रोखणे भारताला शक्य झाले होते. १९६५ साली पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. त्या हल्ल्याची योजना आखताना दिल्लीवर धडक मारली जाईल असे त्यांनी गृहित धरले होते. तेव्हाही भारताची लष्करी तयारी ङ्गार प्रचंड अशी नव्हती. परंतु भारतीय लष्कराने छोटा नॅट विमानाचा कौशल्याने वापर केला आणि पाकिस्तानचे रणगाडे भारतात घुसण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या मार्गात पाणी सोडून दलदल निर्माण केली. दिल्लीवर धडक मारणे तर दूरच पण उलट भारतीय लष्कराने लाहोरच्या वेशीवर आपल्या बंदुकीच्या दस्त्यांचे दस्तक दिले. १९७२ चा भारताचा विजय मात्र खरा निर्णायक होता. केवळ १४ दिवसामध्ये भारताने पाकिस्तानवर मात तर केलीच पण त्याचे दोन तुकडे केले. एवढा मार खाऊन सुद्धा पाकिस्तानचे नेते वल्गना का करतात, असा प्रश्‍न वारंवार विचारला जातो. पाकिस्तानी नेत्यांना सुद्धा आपली ताकद माहीत आहे. परंतु पाकिस्तानातल्या जनतेच्या मन:स्थितीचा विचार करून आपल्या राजकीय अस्तित्वासाठी या नेत्यांना अशा वल्गना कराव्या लागतात.

Leave a Comment