नवी दिल्ली – ऍसिड व अन्य ज्वालाग्रही पदार्थांचा गैरवापर होऊ नये यासाठी त्यांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली आखण्यास सर्व राज्यांना ३१ मार्चची मुदत सर्वोच्च न्यायालयाने दिली. विशेषत: एकतर्ङ्गी प्रेमप्रकरणात ऍसिड व ज्वालाग्रही पदार्थांचा गैरवापर होत असल्याची दखल न्यायालयाने घेतली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने हे आदेश दिले. न्यायालय म्हणाले, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांनी ऍसिड हल्ल्यातील पीडितांना उपचार, तसेच प्लॅस्टिक सर्जरी मोङ्गत उपलब्ध करून देण्याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती न्यायालयात सादर करावी. ऍसिड विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारांनी नियमावली आखण्याचे आदेश याआधी न्यायालयाने १८ जुलै रोजी दिले होते.
या आदेशाबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांनी सादर करावी. महिलांवर होणारे ऍसिड हल्ले रोखण्यासाठी न्यायालयाने याआधी निर्देश दिलेले होते.