सहारा ग्रुपचे महाप्रचंड भूमिगत मिसाईल प्रूफ बंकर

मुंबई – मुबंईच्या उपनगरात सहारा ग्रुप उद्योगाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या दुप्पट आकाराचे मिसाईल प्रूफ भूमिगत बंकर उभारले असून डेटा स्टोरेज सेंटरच्या खालीच हे बंकर उभारले गेले आहे. आतील भागावर सतत नजर ठेवून असलेले ८४ सुरक्षा कॅमेरे, ३.७ मीटर उंचीची भक्कम भिंत, त्याला तारांचे कंपौड असलेल्या या बंकरमध्ये सहारच्या ३० दशलक्ष म्हणजेच ३ कोटी गुंतवणूकदारांची वैयक्तीक माहितीची कागदपत्रे सुरक्षित ठेवली गेली आहेत. ६६,६०० अग्निरोधक धातूपेट्यांत ही कागदपत्रे असून त्यांची संख्या आहे तब्बल २० कोटी आहे. म्हणजेच या कागदपत्रांची संख्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या लोकसंख्येएवढी आहे.

सहारा इंडिया परिवार नावाने कार्यरत असलेला हा उद्योगसमूह ६५ वर्षीय सुब्रतो रॉय यांच्या मालकीचा असून ते भारतातील टॉपचे फायनान्सर मानले जातात. त्यांची उद्योग संपत्ती ६७० अब्ज डॉलर्स इतकी असून गेल्या ३५ वर्षात त्यांनी देशात साम्राज्य उभे केले आहे. न्यूयार्कचे प्लाझा हॉटेल, लंडनमधील ग्रोसनेव्हर हाऊस शिवाय किमान १२० कंपन्या या उद्योगसमुहाच्या मालकीच्या आहेत. त्यात टेलिव्हिजन स्टेशन्स, हॉस्पिटल्स, डअरी फार्म, डिटर्जंटपासून हिर्यांसप्रर्यंत सर्व वस्तूंची विक्री करणारी रिटेल शॉप्स आणि फॉर्म्युला वन रेसिग टीम फोर्स इंडियामधील ४२.५ टक्के शेअर यांचा समावेश आहे. शिवाय त्यांच्या मालकीची १४,५०० एकर जमीनही आहे.

या पलिकडे त्यांचे वैशिष्ट म्हणजे पॅराबँकींग व्यवसाय. ज्या लोकांचे बँक खाते नाही अशा लोकांचा हा उद्योगसमूह खर्‍या अर्थाने सहारा आहे. आणि ही संख्या ६५ टक्के इतकी आहे. सहाराचे एजंट रिक्षाचालक, धोबी, टायर रिप्रेअर करणारे अशा विविध प्रकारच्या छोटे उद्योग करणार्‍याकडून दररोज २० रूपयांपासून कितीही रक्कम गोळा करून ती या उद्योगात जमा करतात आणि या छोट्या लोकांना या महाप्रचंड उद्योगाचे गुंतवणूकदार बनवितात. या एजंटना कंपनीकडून कमिशन दिले जाते असे समजते. या अर्थाने हा सर्वसामान्य जनतेचा सपोर्ट म्हणजेच सहारा ग्रुप आहे.

Leave a Comment