तेजपाल यांची पुरुषार्थ चाचणी सकारात्मक

पणजी – सहकारी पत्रकार तरुणीच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक करण्यात आलेले तहलकाचे संपादक तरुण तेेजपाल यांची आज येथे पुरुषार्थ चाचणी घेण्यात आली. ही चाचणी सकारात्मक आली. गोवा वैद्यकीय महाविद्यलयात तेजपाल यांना या चाचणीसाठी नेण्यात आले. लैंगिक अत्याचारप्रकरणी ही चाचणी करणे अनिवार्य आहे.

सोमवारी सकाळी सुमारे पाच तास तेजपाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुपारी सव्वातीनच्या सुमारास पुढील चाचण्यांसाठी त्यांना पुन्हा आणण्यात आले. तपास संस्थेच्या गरजेनुसार, या चाचण्या करण्यात आल्याची माहिती या महाविद्यालयाचे डीन व्ही. एन. जिंदाल यांनी दिली. मात्र, त्याबाबत सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. सत्र न्यायालकडून जामिन याचिका फेटाळण्यात आल्यानंतर शनिवारी गुन्हे शाखेने तेजपाल यांना अटक केली होती.

आपल्याच संस्थेतील एका महिला पत्रकराचे गोव्यातील एका हॉटेलमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भादंवि कलम 354 अ आणि 376 (2) (क)नुसार त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, तेजपाल यांना इन्स्टिटयूट ऑफ सॉयकिअ‍ॅट्री अँड हयुमन बिहेवियर (आयपीएचबी) मध्येही पुढील तपासण्यांसाठी नेण्यात आले. सध्या पणजी पोलीसांच्या कोठडीत असणार्‍या तेजपाल यांच्या मानवतावोदी दृष्टीने पंखा उपलब्ध करुन देण्याच्या विनंतीवरचा आदेश बुधवावरपर्यंत राखून ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकरी शमा जोशी यांनी दिला.