अनेकविध गुणकारी सब्जा

सब्जा ही तुळशीसारखीच वनस्पती आहे. मात्र तुळस हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाते, तशी सब्जाला धार्मिक मान्यता नाही. तशी ती नसली तरी सब्जा ही तुळशीइतकीच किंबहुना तुळशीपेक्षाही अधिक औषधी गुणधर्म बाळगून असते. मुस्लीम धर्माच्या काही पंथातले भाविक सब्जाचा वापर धार्मिक अंगाने करतात. परंतु जगाभरामध्ये सब्जा ही वनस्पती आणि विशेषत: तिचे बी औषधी म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. दक्षिण अमेरिकेत तिला चियासिडस् असे म्हणतात आणि त्याचा वापर काही औषधांमध्ये केला जातो.

थायलंडमध्ये सब्जाची बी ङ्गालुदामध्ये मिसळले जाते. काही ठिकाणी शरबतामध्ये सब्जा मिसळतात. पूर्वीच्या काळी अपचनावर औषध म्हणून सब्जाचा वापर केला जात असे. घसा बसल्यास तसेच बद्धकोष्टावर त्याचबरोबर डायरिया झाल्यानंतर सब्जायुक्त औषधे वापरण्याची पद्धत होती. जेवणापूर्वी अपेटायझर म्हणून सब्जाच्या बियांचे पेय पिण्याची पद्धत सुद्धा काही देशामध्ये होती.

या बियावरच्या संशोधनाला अजून म्हणावी तशी गती आलेली नाही. परंतु अमेरिकेतील गोल्ड मेडिकल ङ्गौंडेशन या संस्थेने त्यांचा उपयोग मधुमेहावरील औषध म्हणून करता येईल काय, हे चाचपून पाहिले आहे आणि टाईप-२ डायबेटिस झालेल्या रुग्णाच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होण्यास सब्जाच्या बियांचा वापर होऊ शकेल, अशी शक्यता त्यांना वाटायला लागली आहे. थायलंडमध्ये अशा प्रकारचे संशोधन झालेले आहे आणि त्या संशोधनात सब्जाच्या सरबताचा उपयोग शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी होऊ शकेल, असे दिसून आले आहे.

जावा, सुमात्रा, मलेशिया या देशांमध्ये सब्जा सरबत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. परंतु ते तयार करताना त्याच्यात साखर आणि पाण्याबरोबरच मध आणि नारळाचे पाणी मिसळले जाते. या भागातील लोक स्वयंपाका मध्ये सुद्धा सब्जाचा वापर करत असतात. काही लोक सब्जाचे बी वाळवून त्याची पावडर करून ठेवतात आणि ती पावडर निरनिराळ्या खाद्य पदार्थात मिसळतात. त्या मार्गाने सब्जा वनस्पती आपल्या शरीरात जाते, तिच्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, असा त्यांचा विश्‍वास आहे. रक्तप्रवाह क्षीण होणे हे अनेक रोगास निमंत्रण ठरत असते. त्यामुळे सब्जाचा असा वापर तो करणार्‍यांना अनेक विकारांपासून मुक्त ठेवत असतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “अनेकविध गुणकारी सब्जा”

Leave a Comment