सुझुकीची अे विंड हचबॅक सादर

नवी दिल्ली – जपानची सुझुकी मोटर कार्पोरेशन या आठवड्यात थायलंड येथे भरत असलेल्या ३०व्या इंटरनॅशनल मोटर एक्स्पोमध्ये नवी ए विंड हचबॅक कार सादर करत आहे. पुढच्या वर्षापासून या कारचे उत्पादनही थायलंड येथील प्रकल्पातच केले जाणार आहे. भारतीय बाजारपेठेत ही गाडी भारतात भरणार्‍या ऑटो एक्स्पो २०१४ मध्ये सादर केली जाणार आहे

तरूणाईला अपील होईल अशा आकर्षक रंगात आणि आकर्षक सजावटीतील ही कार बाजारात ग्राहकांना खेचून घेईल अशी खात्री कंपनीने व्यक्त केली आहे. सध्या ही कार एनर्जी यलो आणि पॅनारोमिक ब्ल्यू अशा दोन रंगात उपलब्ध होणार आहे. गाडीच्या किमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. सुझुकी ए विंड भारतात मारूती ए – स्टार ला रिप्लेस करेल असे सांगितले जात आहे कारण मारूती ए स्टार भारतीय बाजारात फारशी यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे गाहकांना हा दुसरा चॉईस देण्याचा कंपनीचा विचार आहे.

Leave a Comment