फेसबुक कडून लिटल आय लॅबचे अधिग्रहण

बंगलोर – सोशल साईट क्षेत्रातील आघाडीची कंपनी फेसबुक बंगलोर येथील उत्पादक कंपनी लिटल आय लॅबचे अधिग्रहण करत असून त्यासंबंधीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे समजते. येत्या कांही आठवड्यात या अधिग्रहणासंबंधी जाहीर घोषणा केली जाणार आहे. भारतातील प्रॉडक्ट कंपनीचे तसेच सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रॉडक्ट कंपनीचे अधिग्रहण होण्याची ही पहिलीच वेळ असून फेसबुकचे भारतातले हे पहिले अधिग्रहण आहे.

इंडियन सॉफ्टवेअर प्रॉडक्ट इंडस्ट्रीयल राऊंड टेबल संस्थेने या अधिग्रहणाचे स्वागत केले आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना जागतिक ग्राहक मिळविण्यास मदत मिळणार आहे. लिटल आय लॅब ही कंपनी अँड्रईड अॅप विकसकांना येणार्‍या अडचणींवर उपयुक्त अशी अॅनेलेसिस मॉनिटरींग टूल्स बनवितात. मे २०१२ मध्ये ही कंपनी स्थापन करण्यात आली असून या कंपनीत आत्तापर्यंत २ लाख डॉलर्सची गुंतवणूक केली गेली आहे असेही समजते.

Leave a Comment