मनसे महायुतीत येणार ?

मुंबई – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची डिसेंबरमध्ये मुंबईत सभा झाल्यानंतर मनसे महायुसीशी हातमिळविणी करेल असे संकेत भाजपमधील वरीष्ठ नेत्यांकडून दिले जात आहेत. नरेंद मोदी मनसेला म्हणजेच राज ठाकरे यांना बरोबर घेण्याबाबत आग्रही आहेत मात्र शिवसेनेकडून त्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. तरीही या प्रश्नातून मार्ग काढण्याचे  जोरदार प्रयत्न सरू असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी तसेच भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष देर्वेंद्र फडणवीस यांनी मनसे विरोधी पक्षात सामील होण्याची संभावना असल्याची सूचक वक्तव्ये यापूर्वीच केली आहेत.आघाडी सरकार विरोधात सर्वच छोट्या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे. गडकरी अणि फडणवीस यांनी सध्याच्या सरकारविरोधात आमच्याशी हातमिळविणी करणार्‍या कोणत्याही पक्षाचे स्वागतच आहे असेही सूचित केले आहे.

गेल्या कांही दिवसांत फडणवीस आणि गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हेही राज ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. लोकसभेच्या गत निवडणुकात मनसेने मुंबईच्या आसपासच्या भागात चांगला प्रभाव दाखविला आहे. मोदी राज यांचे कौतुक सातत्याने करत आहेत तर राजही मोदी यांच्यावर खूष आहेत. मात्र त्यांचा नक्की कल अद्यापी गुलदस्त्यात आहे. मोदी यांच्या सभेनंतर मनसे लोकसभा निवडणुकांसाठीची आपली भूमिका स्पष्ट करेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment