ढोंगी पत्रकार

तरुण तेजपाल यांच्यावर गेल्या काही दिवसात काही आरोप केले जात होत आणि त्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. परंतु काल त्यांच्यावरच्या आरोपाबाबत निश्‍चिती झाली. त्यामुळे त्यांचा ढोंगीपणा अगदीच उघड झाला आहे. त्यांच्यासारख्या निःपक्षपाती समजल्या जाणार्‍या पत्रकाराने आपल्या मुलीच्या वयाच्या सहकारी महिला पत्रकारावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. सार्‍या जगातला भ्रष्टाचार नष्ट करायची मक्तेदारी आपल्याकडेच असल्याचा आव आणणारे असले बोगस पत्रकार किती चारित्र्यहीन असू शकतात हे सार्‍या जगाला बघायला मिळाले. तरुण तेजपाल हा एकटाच नाही तर देशातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाईन दैनिकांमधून सातत्याने ढोंगीपणा करणारे असे अनेक तेजपाल आहेत. त्यांच्या लीला आणि लाचारपणे केल्या जाणार्‍या बौध्दिक कसरती आपण रोजच अनुभवत आहोत. तरुण तेजपालच्या या कामलीला उघड झाल्यामुळे आता आपोआपच त्याच्या मालमत्तेचीही चौकशी झाली पाहिजे. तशी ती झाली म्हणजे तरुण तेजपालही पुरता उघडा पडणार आहे आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पत्रकारितेत अशी पिलावळ जोपासणारे राजकीय नेतेही उघडे पडणार आहेत.

समाजात विविध क्षेत्रात वरच्या पदावर बसलेल्या अशा कामांध लोकांकडे पाहिले म्हणजे मनाला वेदना होतात. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.के.गांगुली हेही त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या एका महिलेचे लैंगिक शोषण करत होते असे सर्वोच्च न्यायालयानेच नेमलेल्या समितीने दाखवून दिले आहे. या न्यायमूर्तीमुळे सारी न्यायव्यवस्थाच बदनाम होण्याची वेळ आली आहे. आसारामबापू सारखा हजारो अनुयायी असलेला कथित पुण्यात्मा सुध्दा कामभावनेच्या प्रक्षोभापासून दूर राहू शकला नाही. परस्त्रीविषयी वाटणारे विकृत आकर्षण आणि त्यापोटी केले जाणारे असे चाळे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जातात. महाराष्ट्रामध्ये असेच एक समाजवादी पुढारी, लेखक लक्ष्मण माने कामपिसाटाप्रमाणे वागून अडचणीत आले आहेत. थोर समाजवादी नेते एस.एम.जोशी यांनी तर या लक्ष्मण मानेंना आपला मानसपुत्र मानले होते. त्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याच्या कीर्तीवर या मानसपुत्राने असा काळिमा ङ्गासला. वृध्दापकाळाकडे झुकणार्‍या वयातसुध्दा त्यांना संयम पाळता येत नाही. तरुण वयात पाय घसरला तर तो तारुण्याचा साहजिक परिणाम मानला जातो. परंतु साठीच्या उंबरठ्यावर, सत्तरी पार केल्यानंतर आणि अगदी वयाची आठ दशके (एन. डी. तिवारी) पार पडल्यानंतरसुध्दा या लोकांना आपल्या कामवासना आटोक्यात ठेवता येत नाहीत. हे बघून त्यांच्या या विकृतीची किळस येेते.

तरुण तेजपालने जो प्रकार केला. तो नेमका काय होता याचा आजपर्यंत उलगडा झाला नव्हता. परंतु आता या पीडित तरुणीने वृत्तपत्रांसाठी म्हणून जे निवेदन प्रसिध्द केले आहे त्यात स्पष्टपणे आपल्यावर झाला तो बलात्कारच होता असे म्हटले आहे. तरुण तेजपाल हा मोठा भ्रष्टाचाराचा भंडाङ्गोड करणारा पत्रकार समजला जातो. परंतु असेच पत्रकार पापाने प्रचंड पैसा कमवत असतात. असा पैसा जास्त झाला की माणूस उन्मत्त होतो. त्यातलाच हा प्रकार आहे. तरुण तेजपाल याच्या विरुध्द उपलब्ध झालेले फुटेज नेमके काय आहे हेही आता उघड झालेले आहे. संबंधित तरुणीला तरुण तेजपाल लिफ्टमध्ये खेचत असल्याचे आणि थोड्या वेळाने ती तरुणी निराश अवस्थेत बाहेर पडत असल्याचे दृश्य कॅमेर्‍यात बंद झाले आहे. आता तरुण तेजपाल पश्‍चात बुध्दीने हे सारे भाजपाचे कारस्थान असल्याचे कितीही कोकलत असला तरी त्याची आजपर्यंतची सारी विधाने त्याचा अपराध सिध्द करणारी आहेत. त्यामुळे भाजपाच्या कारस्थानाची थिअरी केराच्या टोपलीत टाकण्याच्या लायकची झाली आहे. भारतीय जनता पार्टीला तरुण तेजपालचा बदला घेण्याचे काही कारणच नाही. त्याने १९९८ सालच्या आसपास कॉंग्रेसकडून पैसे खाऊन भारतीय जनता स्टिंग ऑपरेशन करून खळबळ उडवून दिली होती.

भारतीय जनता पार्टी सत्तेवरून गेल्यानंतर कॉंग्रेस सत्तेवर आली आणि कॉंग्रेसने तरुण तेजपालला असे स्टिंग ऑपरेशन करण्याची रोज एक संधी दिली आहे. ए. राजा, कलमाडी, शीला दीक्षित, रॉबर्ट वड्रा अशा कितीतरी दिग्गजांनी दररोज एक गौप्यस्ङ्गोट करण्याची संधी तरुण तेजपालला उपलब्ध करून दिली होती. त्याच्या कथित पुरोगामित्वाला कॉंग्रेसचीच रसद मिळत असल्यामुळे तो शांत झाला. तरुण तेजपालला आता अटक होणे अटळ आहे. कारण त्याने स्वतःच बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या तहलका डॉट कॉमची व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी हिनेसुध्दा स्वतःच पोलीस किंवा न्यायाधीश असल्याचा आव आणून तरुण तेजपालला माङ्गही करून टाकले होते आणि पोलिसात न जाता आतल्या आत तरुण तेजपालला प्रायश्‍चित्त देऊन शुध्द करून घेण्याचा डाव टाकला होता. परंतु सार्‍या जगाला कायदा समजून सांगणार्‍या या भ्रष्ट मंडळींना आपला डोळे झाकून दूध पिण्याचा उद्योग लोकांना समजत नाही असे वाटत होते. बलात्काराच्या खटल्यामध्ये एक संपादक सापडतो आणि त्याचा न्याय पोलिसांनी करण्याच्या ऐवजी त्याची सहाय्यक संपादिकाच करते हा मतलबीपणा लवकरच उघड झाला आणि आता तरुण तेजपालच्या हातात कधीही बेड्या पडणार हे स्पष्ट झाले.

Leave a Comment