हिटलरच्या चेहर्‍याशी साम्य असणारा श्वान

जर्मन हुकुमशहा हिटलर आज जगात कितीही नावडता नेता असला तरी त्याच्या चेहर्‍याशी साम्य असणारा पॅच नावाचा कुत्रा मात्र लोकप्रियतेचा विक्रम रचत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुसर्‍या जागतिक युद्धात हिटलरशी दुश्मनी असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथला हा कुत्रा रहिवासी आहे आणि अमेरिकेतच त्याला मोठा चाहता वर्ग मिळाला आहे.

हकीकत अशी की व्हाईट नावाची महिला या कुत्र्याची मालकीण आहे. तिने आपल्या या पॅच कुत्र्याचा फोटो इंटरनेटवर लोड केला आणि तिच्या मित्रमैत्रिणींकडून व परिचितांकडून पॅच अगदी हिटलर सारखा दिसत असल्याच्या प्रतिक्रिया तिला मिळाल्या. तो पर्यंत या साम्याची खबरच व्हाईटला नव्हती. प्रतिक्रिया आल्यावर तिने बारकाईने पॅचचे निरीक्षण केले तेव्हा तिला हिटलरच्या चेहर्‍याशी पॅचच्या चेहर्‍याचे असलेले साम्य एकदम स्ट्राईक झाले. त्याच्या नाकाखाली असलेला काळा डाग अगदी हिटलरच्या मिशीसारखा आहेच पण डोक्यावरच्या केसांचा एक पट्टाही हिटलरच्या केसांशी साम्य असणारा आहे. विशेष म्हणजे त्याचे वागणेही हिटलर स्टाईलच आहे.

त्याची आई आणि तीन भावंडेही व्हाईटकडे आहेत मात्र पॅचने त्याच्या रूपामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यात यश मिळविले असून त्याला अमाप लोकप्रियता लाभली आहे. एव्हरी डॉग हॅज हीज डे ही म्हण पॅचच्या बाबतीत तरी अगदी खरी ठरली आहे.

Leave a Comment