चार वर्षात स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार

आज जसे मोबाईल फोन सर्वसामान्यांच्ंया हातात दिसत आहेत तसेच स्मार्टफोनही दिसू लागतील कारण येत्या चार वर्षात स्मार्टफोन्सच्या किमती कुणालाही सहज परवडतील असे निरीक्षण आयडीसी या संशोधन संस्थेने नोंदविले आहे.

या संस्थेच्या मते आशिया पॅसिफिक सारखीच लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि मध्यपूर्व ही स्मार्टफोनसाठीची बहरती मार्केट आहेत. अशा मार्केटमध्ये किमती हा मोठा संवेदनशील मुद्दा असतो. स्मार्टफोन क्षेत्रात अनेक नामवंत कंपन्या आहेत आणि दररोज नवीन उत्पादने बाजारात आणली जात आहेत. विक्रीची संख्या वाढेल तशी स्पर्धा वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यामुळे किमती कमी होतील.

या वर्षात जगात स्मार्टफोन धारकांचा आकडा १ अब्जाच्या पलिकडे जात आहे व २०१७ सालापर्यंत तो पावणेदोन अब्जांवर पोहोचणार आहे. परिणामी फोनच्या सरासरी किमती घसरणार आहेत असे आयडीसी मोबाईल फोन रिसर्च टीम मॅनेजर रामन लामास यांनी सांगितले. ते म्हणाले की या वर्षात आशिया पॅसिफिक मार्केटमध्ये स्मार्टफोनचा खप ५२८.२ दशलक्षांवर गेला आहे व २०१७ पर्यंत तो ९८६ दशलक्षांचा आकडा पार करेल असे संकेत मिळत आहेत. भारत, चीन, ब्राझील या देशांत मध्यमवर्गीयांची संख्याही वाढती आहे व हा वाढता मध्यमवर्गच स्मार्टफोन विक्री वाढण्यास हातभार लावणार आहे. २०१७ पर्यंत भारत स्मार्टफोन साठी तिसर्‍या क्रमांकाची बाजारपेठ असेल असेही ते म्हणाले.

Leave a Comment