बीड : बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अखेर बीडमधून बदली करण्यात आली आहे. केंद्रेकर यांच्या बदलीमुळे बीडच्या जनतेत पुन्हा एकदा नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा येथील विविध संघटनेने दिला आहे. जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दुष्काळाच्या काळात बीड जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केले आहे.
सामान्य जनता कार्यालयाच्या बाहेर कामांसाठी फे-या मारत असतांना, दिवसभर अॅण्टी चेंबरमध्ये दडून बसणा-या अधिका-यांपैकी केंद्रकर हे नव्हते, म्हणून बीडच्या जनतेत ते गेल्याद काही दिवसांपासून अधिककाळ लोकप्रिय झाले होते.
जनतेच्या विरोधानंतरही जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची सरकारने बदली केली आहे.
मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र यामुळे बीडसह राज्यातील जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. केंद्रकर यांची झालेली बदली रदद करावी या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा बीड जिल्ह्यातील विविध सामाजीक संघटनेने देण्यात आला आहे.