ऊसदरासाठी आंदोलकानी ७० वहाने जाळली

मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांनी ऊसदरावर दिल्ली दरबारी तोडगा न निघाल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरूच ठेवले आहे. हे आंदोलन आता सरकारच्या हाताबाहेर जातेय असे वाटत आहे. शेतक-यांनी बुधवारपर्यंत कराड-सांगली परिसरात जवळपास ७० वाहनांची जाळपोळ केली आहे. त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन चिरडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऊसदराच्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातले जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दरम्यान शेतकरी संघटनेने सरकारला तोडग्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

राज्यातील शेतक-यांनी ऊसाला दर मिळावा म्हणून खासगी आणि सरकारी वाहनांची तुफान तोडफोड सुरू केली आहे. त्यामुळे एसटी बसेस, ऊसवाहतूक करणारे ट्रक्स आणि इतर वाहनांचंही मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. इचलकरंजीत आंदोलकांनी वारणा दुधाचे टँकर थांबवून संपुर्ण दूध रस्त्यावर ओतले आहे. यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

सांगली, कराड आणि कोल्हापूर परिसरात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत ७० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. तर २० प्रवाशी जखमी झाले आहेत. बुधवारी पुणे-बंगळुरु महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून वाहतूकही विस्कळीत केली होती. विशेष म्हणजे ऊसदराच्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातले जनजीवनही विस्कळीत झाले आहे. दरम्यान शेतकरी संघटनेनं सरकारला तोडग्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे जाळपोळ आणि तोडफोडीवर आता सरकार नुसते बघ्याचीच भूमिका घेणार का? हा प्रश्नच आहे.

Leave a Comment