पाटणा – बिहारच्या मुजफ्फरपूर शहरात आज एका उड्डाणपुलाचा मधला भाग मालगाडीवर कोसळला. ही दुर्घटना घडली त्यावेळी पुलावरून आणि खालूनही वाहने जात होती. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले.

पाटणा – बिहारच्या मुजफ्फरपूर शहरात आज एका उड्डाणपुलाचा मधला भाग मालगाडीवर कोसळला. ही दुर्घटना घडली त्यावेळी पुलावरून आणि खालूनही वाहने जात होती. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले.
मुजफ्फरपूरच्या मध्यवर्ती भागात 40 वर्षे जुना माडीपूर उड्डाणपूल आहे. या पुलाचा सुमारे 50 फूट लांब भाग आज अचानकपणे कोसळला. ही दुर्घटना घडली त्यावेळी या पुलावरून किमान दोन रिक्षा जात होत्या. पुलाचा भाग मालगाडीवर कोसळला. त्यामुळे सिमेंट वाहून नेणार्या मालगाडीचे दोन डबे रुळांवरून घसरले.
पुलाचा भाग कोसळल्यानंतर चालकाने तातडीने मालगाडी थांबवली. कोसळलेल्या पुलाच्या ढिगार्याखाली काही दुचाकीही अडकल्या. या दुर्घटनेनंतर झालेली गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. या दुर्घटनेमुळे मुजफ्फरपूर ते मोतीहारी आणि हाजीपूर यादरम्यानची रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली.