मुंबई- गेल्या काही दिवंसापासून दिल्ली तील बलात्काराचे लोण आता मुंबईत येवून पोहचले आहे. मुंबईतील बोरिवली भागातील १७ वर्षिय तरूणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलत याप्रकरणी तिघा जणांना अटक केली त्यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी सुरू आहे
कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या एका १७ वर्षीय तरूणीवर सोमवारी रात्री १० च्या सुमारास रिक्षा चालकाने अडवले. या मुलीने घरी जाण्याकरीता रिक्षा पकडली असता चार रिक्षावाल्यांनी जवळच्या एका टेम्पोमध्ये बंद केले. यावेळी चौघांनी मिळून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.
या प्रकरणी तरूणीने पोलिस ठाण्या मध्येण फिर्याद दिल्यावनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तीन रिक्षा चालकांना अटक केली. असून या प्रकरणातील एक रिक्षाचालक अजूनही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.