दीपिकाची बहिणच करते टीका

संजय लीला भन्सालीचा नुकताच प्रदर्शित झालेल्या `राम लीला’ हा सिनेमा हिट झाल्याचने सध्यात भलतीच फार्ममध्ये आहे. गेल्या काही दिवसाच्या हिट सिनेमामुळे सर्वांचा कौतुकाची पात्र ठरलेल्या अभिनेत्री दीपिका पादूकोनला दुसरे तिसरे कोणाच्या नाही तर स्वतःच्या बहिणीच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत बोलताना दीपिका म्हणाली, ‘माझी छोटी बहिण अनीशा सर्वात मोठी टीकाकार आहे. अनीषा तिच्या विचारांच्याबाबतीत ईमानदार आहे. ती माझी सर्वात मोठी टीकाकार असून, तिच्या मनात जे आहे तेच ती बोलते. मग ती माझ्याबाबतली टीका असली तरीसुद्धी ती सत्य बोलते. मला त्याचे अजिबात वाईट वाटत नाही कारण ती ईमानदार आहे आणि माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा ती करते.’

नुकताच प्रदर्शित झालेला रामलीला हा सिनेमा अनीषाला खूप आवडला. यशाच्या शिखरावर असलेली २७ वर्षीय दीपिका विवाहबंधनात अडकण्यासाठी तयार नसल्याचेही ती म्हणाली. तिच्या करियरचा आणि लग्नाचा काहीच संबध नसून, सध्या ती अशीच खूष असल्याचेही दीपिकाने यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment