नवी दिल्ली- एखाद्या मतदारसंघात यापैकी कोणीही नाही’(नोटा) हा पर्याय सर्वाधीक मतदारांनी निवडल्यास त्या ठिकाणी फेरमतदान घेण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. नोटा’ पर्यायाला सर्वाधिक मत मिळाल्यास संबंधित मतदासंघात फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यासाठी जगन नाथ यांनी जनहित याचिका दाखल केली होती.
सरन्यायाधीश पी.सथाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. यासंदर्भात इतक्या लवकर अशा प्रकारचे आदेश देणे घाईचे ठरेल. नोटा’ला देशातील मतदार कसे प्रतिसाद देतात हे पहावे लागेल असे, मत न्यायालयाने व्यक्त केले. मतदानयंत्रामध्ये यापैकी कोणीही नाही’ या पर्याया देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 27 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्यात आयोगाने नोटा’चा पर्याय दिला आहे.