ऊसदरासाठी मुख्यमंत्री आज राजु शेट्टींना भेटणार

कराड- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सोमवारी पुण्यातिथी आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडमध्ये प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाथीस्थळी पोहोचून आदरांजली वाहिली. उस दरासाठीचे आंदोलन बाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुपारी दोन वाजता राजु शेट्टींना भेटणार असल्याचे समजते. या चर्चेतून उसाचा दर निश्चीत होईल असे मानले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे निमित्त साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कराडमध्ये ऊसदरासाठी आंदोलन सुरू केले आहे. शहरातल्या सर्व संवेदनशील ठिकाणी जास्त कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व आंदोलकांना समाधिस्थळापासून सात किलोमीटर अंतरावर थांबवण्यात आले आहे. येथील कडक सुरक्षा व्यवस्था पाहता, काही गंभीर प्रसंग उद्भवण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले राजु शेट्टींच्या भेटीला गेले असून त्यांनी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दरवाढीबद्दलच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी सोमवारी कराडमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह जमले आहेत. रविवारी मुंबईतली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातले स्वाभिमानीचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले असून ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात येते आहे. शनिवारी रात्री बाराच्याी सूमारास वारणा साखर कारखान्याचं शेरी पार्कमधले शेती कार्यालय पेटवण्यात आले असून सांगली जिल्ह्यातही अनेक एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. तर पंढरपूर तालुक्यात ऊस वाहून नेणारा एक ट्रॅक्टर कार्यकर्त्यांनी पेटवून दिला. सोमवारी ‘कराड बंद’चे ही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment