ऐन हिवाळ्यात औरंगाबादमध्ये‍ पाऊस

औरंगाबाद: आंध्रप्रदेशातील हेलन या चक्रीवादळाचा फटका मराठवाडयाला बसला आहे. त्या मुळे गेल्यां दोन दिवसांपासून सर्वत्र पाऊस होत आहे. ऐन हिवाळ्यात औरंगाबाद शहराला पावसाने झोडपून काढले. सोमवारी पहाटे औरंगाबादेत तब्बल चार तास धो-धो पाऊस बरसला. त्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळाले. पहाटे पाच वाजल्याळपासून सुरू झालेला पाऊस सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होता.

या आवकाळी पावसाने हजेरी लावल्यादने मराठवाडयातील शेतमालाच चांगलेच नुकसान झाले. हरभरा, तुर, गहू , टोमॅटो आणि वेचणीसाठी आलेल्या कापसाचेही मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस रब्बी पिकांना पोषक मानला जात आहे. या पावसामुळे विशेषत गहू व ज्वारीच्या पिकांना चांगलाच फायदा झाला आहे.

दरम्यान मुंबई उपनगरातील काही भागातही काल रात्री पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. आंध्रप्रदेशातील हेलन या चक्रीवादळाचा फटका मराठवाडयाला बसला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह़यात पावसाने हजेरी लावली आहे.