शाहरुखच्या`मन्नत`या बंगल्यातील आग आटोक्यात

मुंबई- किंग खान शाहरुखच्या`मन्नत` या बंगल्याला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवांनानी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मुंबईत कालचा दिवस हा अग्नितांडवाचाच ठरला आहे. बॅक बे आगार जवळील आंबेडकरनगर झोपडपट्टी, एल अँड टीचं इमर्जन्सी प्लांट मध्येिही आग लागली होती. ही आग आटोक्याटत आणण्या त अग्निशमन दलाच्याा जवानाला यश आले आहे.

आग लागली त्यावेळी शाहरुख खानसह त्याचे सगळे कुटुंब बंगल्यात उपस्थित होते. आग लागल्यानंतर फायर अलार्म वाजला आणि त्यानंतर शाहरुखने याची माहिती लगेचच अग्निशमन दलाला दिली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीनंतर संपूर्ण `मन्नत` बंगल्याचा परिसर अंधारात होता.

अग्निशमन दलाला `मन्नत` बंगल्यातील आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर ही आग विझवण्यात आली. यामुळे कुठलीच जीवित हानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment