रविंद्र जाडेजाने मोडला अजमलचा विक्रम

कोची: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने यंदा वन डेत सर्वाधिक विकेट मिळवण्याचा पराक्रम गाजवला आहे. जाडेजाने या वर्षभरात २९ वन डे सामन्यांत तब्बल ४९ विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत पाकिस्तानचा सईद अजमल हा गोलंदाजात टॉपवर होता. त्याने वर्षभरात २५ वन डे सामन्यांमध्ये ४८ विकेट्स घेतल्या होत्या.

वेस्ट इंडिज विरूध्दच्या कोची येथील वनडे सामन्याोत जाडेजाने डॅरेन सॅमीला बाद करून त्याने त्याच्या ४९ व्या विकेट्सची नोंद केली. यंदाच्या वर्षभरात सर्वाधिक विकेट्स घेणा-या गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा सईद अजमल टॉपवर होता. त्याने २५ वन डे सामन्यांमध्ये ४८ विकेट्स घेतल्या होत्या. पण जाडेजाने कोची वन डेत विंडीजच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत अजमलला मागे टाकले आहे.

दरम्यान, याच सामन्यात त्या सोबतच टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहलीने वनडे सामन्यात सर्वात वेगवान पाच हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराटने आजच्या सामन्यात ८१ धावा पूर्ण करीत हा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम विडीजच्या रिचर्डसनच्या नावावर होता. त्याने १२६ सामन्यात पाच हजार धावाचा टप्पा गाठला होता. विराटने १२० सामन्यात हा विक्रम केला आहे.

Leave a Comment