सुटीवर आलोय- जरा एकटं सोडा

मसुरी – क्रिकेट मधून नुकतीच ऐतिहासिक निवृत्ती घेतलेल्या सचिनचा पिच्छा पत्रकार अजूनही सोडण्यास तयार नसल्याचा अनुभव त्याला मसुरीत आला. सचिन पत्नीसह सुटी घालविण्यासाठी मसुरी येथे पोहोचला, मात्र लगेच त्याला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा वेढा पडला आणि त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरूही झाली. सचिनने शांतपणा कायम ठेवत पत्रकारांना आपण सुट्टीवर आलोय, जरा एकटं सोडा, प्रश्न नकोत कारण मी उत्तर देणार नाही असे सांगितले.

सचिनचे मसुरी हे आवडते पर्यटन स्थळ असून दरवर्षी तो येथे कुटुंबासह सुटी घालवायला येतो. बुधवारी दुपारी डेहराडून येथून कारने सचिन मसुरीला गेला असून तेथे तो त्याचा मित्र संजय नारंग यांच्या रॉकबी मनोर या हॉटेलमध्ये उतरला आहे. पत्नी अंजलीही त्याच्या सोबत आहे. दुपारी तीनच्या सुमारास तो पायी पायी फिरायला मिघाला असतानाच पत्रकारांनी त्याला गाठले तेव्हा त्याने वरील उत्तर दिले.

Leave a Comment