मुंबई – मुंबईतील टॅक्सी परवाने देताना त्यातले १० टक्के परवाने महिलांसाठी राखून ठेवण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. अशा आरक्षणाची तरतूद असणारा ठराव राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीतही मंजूर करण्यात आला आहे. मुंबईमध्ये ङ्गोन करून टॅक्सी मागविण्याच्या योजनेत ७,८४४ परवाने दिले जाणार असून त्यातील १०० परवाने महिलांसाठी राखीव असणार आहेत.
टॅक्सीचा परवाना घेताना भरावयाच्या शुल्कात सुद्धा सवलत दिली जाणार आहे. परवाना घेताना तीन लाख रुपये शुल्क भरावे लागते, मात्र महिला टॅक्सी चालकांसाठी हे शुल्क दीड लाख रुपये एवढे असेल. मुंबईत १९,६८७ टॅक्सी परवाने रद्द झालेले आहेत. त्यातील चार हजार परवाने पुन्हा दिले गेले आहेत. हे परवाने ङ्गोनवरून टॅक्सी बोलविण्याच्या सेवेसाठी दिले गेले आहेत.
आता १५ हजार परवाने देण्यास मोकळे असून त्यातले ७,८४४ परवाने ङ्गोन टॅक्सी सेवेसाठी दिले जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ऍटो रिक्षा चालकांच्या परवान्यांच्या बाबतीत सुद्धा विचार विनिमय करण्यात आला आहे.