योगाचा नवा अवतार ट्रोगा

भारताच्या बाहेर योगशास्त्र बरेच लोकप्रिय होत चालले आहे. परंतु निरनिराळया देशांमध्ये योगाचा भारतापेक्षाही वेगळ्या पध्दतीने विचार करून त्यात बरेच बदलही केले जात आहेत. अमेरिकेमध्ये एका भारतीय योगतज्ञाने सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानात योगासने करण्याची एक पध्दत शोधून काढली आणि तिच्यामुळे योगासनांचे ङ्गायदे वाढत असल्याचे दाखवून दिले. आता ऑस्ट्रेलियामध्ये दोघा योग तज्ञांनी ऑस्ट्रेलियात रुढ असलेल्या टीआरएक्स या व्यायामपध्दतीचा आणि योगाचा मिलाङ्ग करून ट्रोगा नावाची एक नवीन व्यायाम पध्दती विकसित केली आहे. टीआरएक्स ही दोर्‍यांचा आणि विशिष्ट प्रकारच्या जाळ्यांचा वापर केला जाणारी व्यायाम पध्दती आहे.

बेन लुकास आणि केट केंडाल या दोन व्यायाम प्रशिक्षकांनी ही पध्दती विकसित केली आहे. त्यातील बेन लुकास हा गेल्या तेरा वर्षांपासून व्यायाम शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर केट केंडाल हा पाच वर्षापासून योग शिक्षक म्हणून कार्यरत आहे. बेन लुकासचा योगाशी काही संबंध आलेला नव्हता. तो काही खेळाडूंना प्रशिक्षण देत होता. त्याचे खेळाडू खेळामध्ये अधिक तरबेज व्हावेत यासाठी त्याने योगाचा अवलंब करावा अशी सूचना त्याला करण्यात आली. तेव्हा तो योगाचा विचार करायला लागला. उभे राहून पोटातून वाकून पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करणे ही शारीरिक तंदुरुस्तीची काही चाचणी होऊ शकते हे त्याला माहीत सुध्दा नव्हते. पण योगामुळे त्याला हे माहीत झाले आणि त्याने आपल्या विद्यार्थ्यांना सक्तीचे केले आहे.

त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने योगातल्या काही तंत्रांचा आपल्या टीआरएक्स या पध्दतीशी मेळ घातला. त्याबाबतीत त्याने केट केंडालचा सल्ला घेतला आणि एक नवा व्यायाम प्रकार तयार झाला. केट केंडाल हा भारतात येऊन योगाचे शिक्षण घेऊन गेला आहे. बेन लुकासला शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाचे महत्त्व पटले आहे परंतु आता तो अधिक खोलात जाऊन अभ्यास करायला लागला आहे आणि खेळाडूंची मनःस्थिती योग्य रहावी यासाठी योगाच्या पुढच्या पायर्‍या गाठण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तो आता ध्यानावर विचार करायला लागला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment