नवी दिल्ली – भाजप आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवणार्या आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी विरोधकांवर चोरीचा आरोप केला आहे. आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे चोरल्यचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

सोमवारी दिल्लीत आम आदमी पक्षाने निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिध्द केला. या जाहीरनाम्याच्या प्रकाशन सोहळ्यात केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपवर आरोपांची फैरी झाडल्या. दिल्लीत आम आदमीच्या जाहीरनाम्यात काही योजनान्चा समावेश करण्यात आला आहे. मात्र काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष तोच जाहीरनामा चोरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आम आदमी पक्षाला आलेल्या परकीय देणग्या चौकशीच्या फेर्यात अडकल्या असतानाच यावर केजरीवालांनी भाष्य केले. आमच्या पक्षाला 10 रुपयांची देणगी जरी आली तरी त्याची माहिती आमच्या वेबसाईटवर एका क्लिकवर 3 मिनीटांमध्ये उपलब्ध होते.
याउलट भाजप व काँग्रेस निवडणुकीत करोडो रुपये उधळतात. हा सगळा दोन नंबरचा पैसा असून हा पैसा कुठून येतो यावर दोन्ही पक्ष कधीच माहिती देत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.