पुणे – एकविसाव्या शतकातील एक मोठी समस्या म्हणजे सोनोग्राङ्गी मशीनमुळे होणारे गर्भलिंगनिदान आणि त्यातून होणार्या स्त्रीगर्भहत्या. याला आळा घालण्यासाठी रुग्णालयातील सोनेग्राङ्गी मशीनला ‘युनिक कोड’ नंबर देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या दोन महिन्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी खास पथकांची नेमणूक करण्यात आली असून सोनोग्राङ्गी केंद्रांवर त्यांचा ‘वॉच’ राहणार आहे.
गेल्या काही वर्षात शहर आणि उपनगरात गर्भलिंगनिदान करून घेण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. त्यावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले होते. गेल्या दीड वर्षांपूर्वी सदाशिव पेठेतील एका डॉक्टरला प्रशासनातील पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे प्रशासनवर चोहोबाजूंनी टीका होत होती. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने सोनोग्राङ्गी केंद्रांच्या मुसक्या काही प्रमाणात आवळल्या होत्या. मात्र त्यात अपेक्षित प्रमाणात यश आले नव्हते.
गर्भलिंग निदानाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कंबर कसली असून अन्य पर्यायांचा शोध घेण्यात येत आहे, असे स्पष्ट करून डॉ. सोमनाथ परदेशी म्हणाले की, त्यासाठी विभागनिहाय पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार या पथकांना मनुष्यबळ देण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यात हे कोड देण्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती डॉ. परदेशी यांनी दिली.
युनिक कोडमुळे सोनोग्राङ्गी केंद्रांची तपासणी करणे सोपे होणार आहे. यापूर्वी राबविलेल्या मोहिमेमुळे गर्भलिंग निदानाच्या प्रकारांना काही अंशी आळा बसला आहे, मात्र या योजनेमुळे सक्षम यंत्रणा उभी राहणार आहे.