रामलीलाच्या प्रदर्शनावर 5 डिसेंबरपर्यंत बंदी

नवी दिल्ली – संजय लीला भंसालीचा बहुचर्चित रामलीला चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्लीच्या कडकडडूमा कोर्टाने देशभरात बंदी घातली आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्‍या रामलीला चित्रपटाची आता 5 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत हिंदू संघटनांनी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर दिल्लीच्या कडकडडूमा कोर्टाने रामलीलावर 5 डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. चित्रपटात रामच्या भूमिका योग्य पद्धतीने दाखवण्यात आलेली नाही. चित्रपटातील काही दृश्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं हिंदू संघटनांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे.

सुनावणीदरम्यान कोर्टानेही धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटात दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

Leave a Comment